आज १५ मार्च २०१७ आज मी नोकरीत असतो तर ३८ वर्ष पूर्ण झाली असती. ६ वर्षे लवकर रिटायरमेंट घेतली. पण माझ्या आवडीचे काम करावयास मिळणे या सारखे समाधान नाही. मी माझ्या संसारात फार सुखीसमाधानी आहे.
Tuesday, 14 March 2017
Monday, 13 March 2017
माझी शाळा
शाळा..
*न्यू सिटी हायस्कूल* धुळे
|| श्री ||
मज आवडते ती मनापासूनी
शाळा, लावते लळा,
माउली जशी ती बाळा!
आज ३ जुलै २०१६!
माझ्या शाळेला १०० वर्षे झाली.
माझे मन बालपणात, शालेय जीवनात डोकावले.
आमचे घाणेकर कुटुंब या शाळेच्या संबंधित.
माझे वडील....
कै. श्री महादेव गणेश घाणेकर BABT
हे या शाळेत ३६ वर्षे शिक्षक होते.
ते संस्कृत, गणित, इंग्रजी, भूगोल पी टी हे विषय शिकवीत होते. त्यांचा शाळेत दबदबा होता. त्यांची शिस्त आजही आठवते.
माझा मोठा भाऊ..
कै. सुहास घाणेकर हा आपल्याच शाळेचा विद्यार्थी.
तो आणि मी याच शाळेतून ११ वी एस.एस.सी झालो.
मी १९७३ साली एस.एस.सी. झालो.
आपल्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे...शाळा हि ५ वी ते ११वी. आणि फक्त मुलांसाठी होती.
शाळेचे ते दिवस मंतरलेले होते.
मी शाळेत पी.टी. लीडर होतो.
शाळेची प्रार्थना... म्हणण्यासाठी आम्ही काही मुले हेडमास्तरांच्या केबिन मध्ये माईक वरून प्रार्थना म्हणत असू.
अभ्यासाच्या जोडीने मी शालेय स्पर्धांमध्ये भाग घेत होतो.
शाळेत खूप मैदानी खेळ खेळत होतो. नाल्यावरून उड्या मारणे. पकडापकडी खेळताना पहिल्या मजल्यावरुन उडी मारणे,
त्यावेळी रखवालदार सुकलाल यांचे आमच्याकडे चांगले लक्ष असे. आणि मग ते काळजीमुळे ओरडत असत.
व्यायामाची सवय, गोडी ही आपल्या शाळेमुळेच लागली.
मी सातवीत असेन.... त्यावेळी मोठ्या वर्गाला डिसेंक्शन साठी खार, बेडूक हवे होते...मला जेव्हा हे समजले तेव्हा मी ते पकडून आणून दिले होते...
आणि मला त्याचे डिसेंक्शन बघण्याची संधी मिळाली होती.
त्या काळातले शिक्षक ..
यांचा मुलांच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे... त्यांची पदोपदी आठवण येते.
मुख्याध्यापक
व्ही.व्ही. पाणदरे.
यांचे मुलांना योग्य मार्गदर्शन
आपले उपमुख्याध्यापक....
मुकुंद कृष्णाजी पाध्ये सर.... हे प्रत्येक मुलाला त्याच्या व त्याच्या वडिलांच्या नावाने आववर्जून हाक मारत असत.
मला ते "विवेक महादेव !" या नावानेच हाक मारत असत.
भूगोल..एम.एस.कुलकर्णी सर
यांनी या विषयाची गोडी लावली.
इतिहास..पंचभाई सर
खूप रमून जायचो इतिहासात
हिंदी..मदनलालजी मिश्रा सर
राष्ट्रभाषा....उत्तम शिकवत असत.
इंग्लिश....वाय. जी. जोशी सर
उत्तम मार्गदर्शन केले परकीय भाषेचे.
सायन्स ...पाध्ये सर..
गणित, संस्कृत... घाणेकर सर
मराठी..एस.एस.मुसळे सर
यांचे हस्ताक्षर खूपच सुंदर होते. शाळेचे सगळे फलक ते लिहित असत.
पी टी.... पगारे सर.
चित्रकला.. नगरकर सर.
आज जो काही मी आहे तो आपल्या शाळेमुळेच.!
ते दिवस मंतरलेले होते.
माझी मुले लहान असताना त्यांना शाळेतील गमतीजमती सांगत असे..
तर त्यांना माझी शाळा कोठे, कशी ते बघावे वाटले म मी त्यांना आपली शाळा दाखवायला घेऊन आलो होतो. मुलांना आपली शाळा खूप आवडली.
आज शाळेला १०० वर्षे होत आहेत. या निमित्ताने अनेक आठवणी मनात आल्या...
मन पुन्हा बालपणात, शालेय जीवनात रमले.
आज आपल्या शाळेच्या निरनिराळ्या संस्था बघताना खूप आनंद होतो.
*ही माझी शाळा!*
*मी न्यू सिटी हायस्कूलचा विद्यार्थी.!*
श्री विवेक महादेव घाणेकर
M.Com
ICICI bank officer
(Retired)
ग्रँटंरोड मुंबई.